esakal | एसटीच्या कळंब आगाराला डिझेल टंचाईचे ग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

st

एसटीच्या कळंब आगाराला डिझेल टंचाईचे ग्रहण

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब : एसटीच्या कळंब आगराला सोमवार (ता.६) पासून डिझेल टंचाईचे ग्रहण लागले असून दोन दिवसांपासून एसटीचे 'ऑपरेशन रद्द'झाले आहे.आगारातून सुटणाऱ्या शहरी तसेच ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या बसेस डिझेल अभावी बंद आहेत.त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असून एसटीला दैनंदिन मिळणाऱ्या आर्थिक उत्पानाला मुकावे लागले आहे.मंगळवार (ता.७) बोरीवली मुबई ही गाडी वगळता अन्य मार्गावरच्या गाड्या बंद ठेवण्याची नामुष्की आगारावर ओढवली आहे.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला;पाहा व्हिडिओ

डिझेलची कमतरता,एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने,कर्मचाऱ्यांच्या पगारी कपात यासारख्या विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळ सध्या चर्चेत आहे.एसटीच्या कळंब आगाराला काल पासून डिझेल मिळाले नसल्यामुळे बससेवा विस्कळीत झाली आहे.एसटीच्या ऐकून फेर्यापैकी ९५ टक्के विविध मार्गावरील  फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.येथील आगाराला दररोज ६ हजार लिटर डिझेल लागत असून याची कल्पना असूनही एसटीच्या वरिष्ठ डिझेल पुरवठा करणाऱ्या संबधित विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे वेळेत डिझेल मिळू शकले नाही.त्यामुळे विविध मार्गावर धावणाऱ्या बसेस सोमवार पासून ठप्प झाल्या असून बसेस सेवा विस्कळीत झाली आहे.त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.बसमध्ये भरण्यासाठी डिझेल नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आगारात बसून रहावे लागत आहे.एसटीच्या कळंब आगारातून धावणाऱ्या औरंगाबाद,पुणे,सोलापूर,नांदेड,मुंबई,लातूर,कोल्हापूर, हुंमनाबाद,बार्शी आदी मार्गावरील बसेवा डिझेल नसल्याने मंगळवार (ता.७) विस्कळीत झाली आहे.सद्या गणेश उत्सव सुरू झाला आहे.त्यामुळे प्रवासी येथील एसटीने दूरवर तसेच ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे.

हेही वाचा: औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

भूमवरून १ हजार ६०० लिटर डिझेल मागविले;

एसटीच्या कळंब आगाराला सोमवार (ता.६) पासून डिझेल टंचाईचे ग्रहण लागले आहे.ते मंगळवारी ही टंचाईचे ग्रहण सुटले नाही.मुंबई सारख्या दूरवरच्या फेऱ्या करण्यासाठी भूमच्या आगाराकडून मंगळवारी १ हजार ६०० लिटर डिझेल मागवून फेऱ्या करण्यात आल्या.मात्र इतर मार्गावरील आजही ९५ टक्के फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.केवळ नियोजन नसल्याने एसटीला दररोज मिळणाऱ्या लाखो रुपयाचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.याबाबत एसटीचे कळंब आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांची संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

loading image
go to top