esakal | जिंतूर बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापारी महासंघाचे आजी- माजी आमदारासह तहसीलदारांकडे निवेदन  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यासंदर्भात बुधवारी (ता. सात) तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी आमदार मेघना- साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तहसीलदार यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात सरसगट बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे.

जिंतूर बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापारी महासंघाचे आजी- माजी आमदारासह तहसीलदारांकडे निवेदन  

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : नियम व अटीसह कडक निर्बंध करुन व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने उघडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी तालुका व्यापारी महासंघातर्फे तहसीलदार व आमदार यांना करण्यात आली. 

यासंदर्भात बुधवारी (ता. सात) तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी आमदार मेघना- साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तहसीलदार यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात सरसगट बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे. शासनाने ता. ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शहरात अनेक दुकानदारांची दुकानें भाडेतत्त्वावरील जागेत आहेत. दुकाने बंद असली तरीही त्यांना जागेचे भाडे, नोकरांचे पगार, लाईट बिल, बँकेचे हप्ते, व्यापाऱ्यांचे देणे- घेणे, कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवावा लागतो.व्यापार बंद असल्याने हे सर्व अर्थचक्र बंद पडले असल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या परिस्थितीचा विचार करुन ता. आठ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने उघडण्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा ता. नऊ एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

हेही वाचा - रेणुका देवी गडावर भीषण अग्नितांडव; मंदिर संस्थान व 125 व्यापारी प्रतिष्ठाने बचावली

यावेळी तालुका अध्यक्ष रमेश दरगड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, गणेश कुऱ्हे, संतोष देशमुख, प्रदीप कोकडवार, बाबाखान, फारुक मिर्झा, कुणाल वट्टमवार, अर्जुन वट्टमवार, सागर चिद्रवार, बिपीन चिद्रवार, रमेश चव्हाण, महमूद राज, शेख समीर, अविनाश कोकडवार, शेख करीम, अनुप चिद्रवार, प्रीतम चिद्रवार, हफेज अनिस खा, गणेश भाकरे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.

शासनाने बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्यावी

गतवर्षी सुद्धा कोरोना माहमारीमुळे अनेक महिने बाजारपेठ बंद होती. त्यामुळे व्यपारी बांधव आर्थिक कोंडीत सापडले. काहींनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. कांही निवडक दुकाने बंद ठेवल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढणार नसून शासनाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सर्वच व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली. 
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image