पोटाची खळगी... त्यांना सीमा पार करून नेली !

अनिल कदम
Wednesday, 22 April 2020

ज्या कारणाने गावकुसे सोडून शहराची वाट धरावी लागली, ती शहरे असे जिवावर उठतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. शहरात महामारीने फैलाव सुरू करताच पुन्हा गावकुसे जवळ करण्यासाठी निघालो खरे, पण दोन दिवसांनंतर ज्या कारणासाठी गावे सोडली तीच समस्या ‘आ’ वासून एका संकटासारखी आमच्या पुढे उभी राहिली. शहरातून निरोप आला काम सुरू झाले, जीव मुठीत घेऊन पुन्हा शहराची वाट पकडण्याशिवाय आमच्यापुढे पर्यायच नव्हता. ही आपबिती सांगताना तेलंगणा सीमेवरील तैनात कर्मचाऱ्यांनाही शेवटी नाईलाज झाला.

देगलूर, (जि. नांदेड) ः पोटाची भूक मोठी व अत्यंत गरजेची असते. मनुष्य असो अथवा प्राणी, त्यांना यासाठी संघर्षाची वाट चोखाळावीच लागते. एरव्ही चाकोरीबद्धपणे जीवन जगण्याचे कसब प्रत्येकाचे सुरूच असते. मात्र, अख्ख्या जगावर घोंगावणाऱ्या काेरोना विषाणूंमुळे जीवन जगण्याच्या कलेवरही प्रचंड प्रमाणात संक्रांत आली, हे कटू सत्य आहेच. यात पोटाची खळगी भरण्याचे विदारक चित्र तर आणखी भेसूर बनले आहे, ही वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही. शेवटी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ते दोघे रानशिवारातून पायवाटेने सीमा पार करूनही गेले.

नात कर्मचाऱ्यांनाही शेवटी नाईलाज झाला
ज्या कारणाने गावकुसे सोडून शहराची वाट धरावी लागली, ती शहरे असे जिवावर उठतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. शहरात महामारीने फैलाव सुरू करताच पुन्हा गावकुसे जवळ करण्यासाठी निघालो खरे, पण दोन दिवसांनंतर ज्या कारणासाठी गावे सोडली तीच समस्या ‘आ’ वासून एका संकटासारखी आमच्या पुढे उभी राहिली. शहरातून निरोप आला काम सुरू झाले, जीव मुठीत घेऊन पुन्हा शहराची वाट पकडण्याशिवाय आमच्यापुढे पर्यायच नव्हता. ही आपबिती सांगताना तेलंगणा सीमेवरील तैनात कर्मचाऱ्यांनाही शेवटी नाईलाज झाला.

हेही वाचा -  धक्कादायक : नांदेडमध्ये कोरोना बाधीत पहिला रुग्ण

तेलंगणात महामारीचे संकट मोठे
सीमा नाक्यावरील आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून ‘तू जाशी तुझ्या गावा’ म्हणत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देऊन त्यांना सोडण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली. मुखेड तालुक्यातील आखरगा येथील दोन युवक तेलंगणातील निजामाबाद येथे हमालीचे काम करून स्वतःची उपजीविका भागवितात. गेल्या महिन्यात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ते गावी अखरगा (ता. मुखेड) येथे आले. पंतप्रधानांचा २१ दिवसांचा लॉकडाउन कार्यक्रम कसातरी पूर्ण केला. ज्या कारणासाठी गाव सोडले होते, ते कारण पुन्हा संकट रूपाने उभे राहील, जिथे कामास होते तेथून निरोप आला, काम चालू झाले मग त्यांची बेचैनी वाढली. सर्वत्र नाकेबंदी असताना मजल-दरमजल करीत हे दोघे सांगवी (उमर) च्या सीमा नाक्यावर आले खरे, मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना तेलंगणात महामारीचे संकट मोठे फैलावले असून तिकडे आपल्याला जाता येणार नसल्याची ताकीद दिली.

भूक ती पोटाची
मात्र, भूक पोटाची त्यांना स्वस्थ कशी बसू देणार..? त्यांनी नजर चुकवत शेतातील पायवाटेने पुन्हा सीमा पार करण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हाती लागले. तासभर त्या दोघांचे ‘समुपदेशन’ करून त्यांना गावाकडे जाण्यासाठी सांगितले. त्यांनी कथन केलेल्या पोटाच्या खळगीची आपबिती ऐकल्यानंतर कर्मचाऱ्यांपुढेही आरोग्य तपासणीचे सोपस्कार पूर्ण करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हताच. शेवटी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ते दोघे रानशिवारातून पायवाटेने सीमा पार करूनही गेले. तोपर्यंत दिवस मावळतीला गेला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stomach cramps ... crossed the border!, nanded news