
हिंगोली शहरांमध्ये नांदेड नाका भागामध्ये आज नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने अवघ्या काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
हिंगोलीत दगडफेकीने तणाव; वाहनांचे नुकसान
हिंगोली : हिंगोली शहरांमध्ये सोमवारी (ता. १२) दगडफेकीच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले असून सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
हिंगोली शहरांमध्ये नांदेड नाका भागामध्ये आज नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने अवघ्या काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड औंढा मार्गावरील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार व इतर वाहनांमधून विटकरींचा खच पडला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आली आहे.
Web Title: Stone Pelting Hingoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..