'राष्ट्रवादी युवक'चे जिल्हाध्यक्ष गोरेंच्या वाहनावर दगड फेक

वाशी (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या कारवर पार्डी फाटा (ता.वाशी) येथे अज्ञाताकडून दगड फेक झाली.
वाशी (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या कारवर पार्डी फाटा (ता.वाशी) येथे अज्ञाताकडून दगड फेक झाली. सकाळ

वाशी (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Youth Congress) जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे (Aditya Gore) यांच्या कारवर पार्डी फाटा (ता.वाशी) येथे अज्ञाताकडून दगड फेक झाल्याची घटना बुधवारी (ता.१८) सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती श्री.गोरे यांनी वाशी पोलिसांना (Vashi Police) कळवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वतीने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअरच्या वतीने अभियान सुरु आहे. त्या निमित्ताने भूम तालुक्यातील जातेगाव व कुक्कडगाव या गावात अनाथ मुलांना भेटण्यासाठी ते उस्मानाबादहुन (Osmanabad) भूमकडे जात होते. त्याची कार (एमएच २५ एएल ००२०) ही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पारडी फाटा येथून भूमच्या दिशेने निघाली असता काही अंतरावर गेल्यानतंर अंधाराचा फायदा घेत वाहनावर अज्ञाताने दगडाने हल्ला केला.

वाशी (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या कारवर पार्डी फाटा (ता.वाशी) येथे अज्ञाताकडून दगड फेक झाली.
उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

यावेळी पुढील कार्यक्रम असल्याने श्री.गोरे यांनी वाहन न थांबवता तसाच पुढे प्रवास चालू ठेवला. झालेल्या दगड हल्ल्यात वाहनाच्या मागच्या बाजूची काच फुटली असून यामध्ये वाहनामधील आदित्य गोरे व कळंबचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी समाधान बाराते हे दोघेही सुखरूप आहेत. घटनेनतंर श्री.गोरे यांनी घटनेची माहिती फोनद्वारे पोलिसांना दिली. भूम तालुक्यातील कार्यक्रम संपल्यानतंर वाशी पोलिस ठाण्यात येऊन रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे आदित्य गोरे यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com