वृक्षतोड थांबवून करूया पर्यावरणाचे संरक्षण, कसे? ते वाचा

file photo
file photo

नांदेड : वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे आज पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचे परिणाम मानवांसोबतच वन्य, जलचर प्राण्यांनाही भोगावे लागत आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले तोडून सिमेंटची जंगले उभारली आहेत. कापडी ऐवजी प्लॅस्टिक पिशव्यांना प्राधान्य देतो आहे. परिणामी पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ती अधिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे सर्वांनी सामाजिक वनिकरणाची चळवळ राबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

आज जग विकास आणि प्रगती साध्य करताना आपण काय गमावले याचा विचारसुद्धा केलेला नाही. दळणवळणासाठी विकासाच्या नावाखाली रस्त्यालगतच्या झाडांची मोठ्याप्रमाणावर कत्तल झाली. मानवाने निवाऱ्यासाठी झाडे तोडून सिमेंटची घरे बांधली. आजही झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच आहे. एकंदरीतच अक्षम्य जंगलतोड ही आज चिंतेची बाब बनली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलातील सजिवांचे अस्तित्व अत्यावश्‍यक आहे. परंतु, अलीकडे त्यांचे आश्रयस्थान आणि अस्तित्व नष्ट होत आहे. असे असताना जागतिक पर्यावरणदिनी फक्त पर्यावरण संवर्धनाचे गोडवे गाण्यातच आपण धन्यता मानत आहोत. त्यामुळे निसर्गाकडून वारसा लाभलेल्या वनसंपत्तीचा व वन्यजीवांचा नाश करणे या बाबी तरी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करणे उचित ठरेल, असे वाटते.

पर्यावरणासाठी प्लॅस्टीक घातक
प्लॅस्टिकच्या निर्मितीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश असतो. त्याचे विघटन नैसर्गिकरीत्या वर्षानुवर्षे होत नाही. परिणामी पाणी, माती, पर्यायासाठी हे प्लॅस्टीक घातक ठरते. पाणी जमिनीत झिरपत नही. नदी, नाल्यांमध्येही सदर प्लॅस्टिक कचरा साचत असल्याने तेही प्रदूषित झाले आहे. प्लॅस्टिक कचरा टाकायचा कुठे, त्याची विल्हेवाट कशी लावायची याची कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याने प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या पर्यावरणाला घतक ठरत आहे. शासनस्तरावर जरी प्लॅस्टिक बंदी झालेली असली तरी, स्थानिक पातळीवर मात्र सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो आहे.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी हे टाळा

  • बाजारात किंवा किराणा दुकानात जाताना कापडी पिशवी जवळ बाळगा
  • प्रवासामध्ये हलकी स्टेनलेस स्टीलची बाटली जवळ ठेवा
  • हॉटेलमधून पार्सल घेण्यासाठी जाताना स्टीलचा डबा बरोबर ठेवा
  • स्ट्रॉचा वापर करू नका
  • प्लॅस्टीकमध्ये पॅकबंद असलेले पदार्थ घेण्याचे टाळावे
  • जुने वापरात नसलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू रिसायक्लिंगसाठी द्या. 

वृक्षतोड थांबविण्याची गरज
येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त वन संरक्षण, पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात तयार करणे आवश्‍यक आहे. तसेच अस्तित्वात असलेले पाण्याचे साठे शुद्ध स्वरूपात टिकवून ठेवणे, प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील घटकाचा वापर टाळणेही गरजेचे आहे. अन्यथा आपण कितीही प्रयत्न केले तरीही पर्यावरणाचे संतुलन राखणे अशक्य आहे. यासाठी प्रत्येकाला वृक्षतोड थांबवून कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागणार आहे. शिवाय प्लॅस्टिकमुक्त जीवनही जगावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com