आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको 

भाऊसाहेब चोपडे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आळंद (जि. औरंगाबाद) : आरक्षणासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवार (ता. 13) सकाळी 10 वाजल्यापासून औरंगाबाद जळगाव महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. तेथेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून सरकारचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
यामध्ये परमेश्वर घोंगडे याच्या घरच्यांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय सेवेत रुजू करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन समाजातर्फे देण्यात येणार आहे. या रास्ता रोकोला आळंदसह उमरावती, नायगव्हान, साताळा, पिंपरी, जातवा या गावांसह परिसरातील समाज बांधव उपस्थित आहेत.

Web Title: Stop the road from the Dhangar community for reservation