महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची ओळख असलेल्या बीडच्या गेवराई शहरात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गल्लो-गल्लीत पारंपरिक टिप-या खेळाचे सराव रंगू लागले आहे. ही परंपरा केवळ गेवराई शहरातच आजही उत्साहाने जपली जात असून, नागपंचमीपूर्वीचा उत्सवाचा रंग आता शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.