Dharashiv News : येरमाळा पोलिसांची दमदार कामगिरी ; अपघातातील अज्ञात ट्रक चालकाला अटक

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स कै.अंजना पवार यांच्या स्कुटीला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली होती
Dharashiv News
Dharashiv Newssakal

-दीपक बारकूल

येरमाळा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स कै.अंजना पवार यांच्या स्कुटीला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.या अज्ञात ट्रकचा तपास काढुन चालकाला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.पोलिसांच्या या कामगीरीमुळे येरमाळा पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार,चोराखळीच्या उपकेंद्राच्या नर्स कै .अंजना गोरोबा पवार (वय.३२) रा.येडशी आज सांय सहा वाजेच्या सुमारास येरमाळ्याकडून आपल्या होंन्डा कंपनीची ऍक्टिवा दुचाकीवरुन (एम.एच .२५.ए.यु.४२८९) येडशी कडे जात असताना येरमाळा येथून जवळच असलेल्या ज्ञानोद्योग उच्चमाध्यमिक विद्यालया जवळ राष्ट्रीय महामार्गावर वेगाने येणार्‍या अज्ञात ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने झागीच ठार झाल्या होत्या.

या अज्ञात ट्रकचा तपास लावने खुप कठीण होते पंरतु पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलिस अधिक्षक गोहर हसन,पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश क्षिरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी धनंजय सांडसे,धम्मदीप पालके,विशाल गायकवाड,महमंद सय्यद यांनी तपास चक्रे वेगाने फिवरत पोलिसांना मिळालेल्या खबरी कडून दोन आयशर टेम्पो असल्याचे सांगण्यात आले.

तसेच गाडीचे टायर स्वच्छ केल्याचा ठिकाण तपासुन गाडीला लावलेले फास्टटॅगच्या मदतीने गाडी नंबर आणि मालकाच्या फोनचे तपशीलीची मदत घेत येडशी,तुळजापुर,सोलापुर,इंदापुर,गाडीचा ठिकाणाचा शोधत घेत चहा टपरी,रसवंती,हॉटेल आदि ठिकाणी विचारपुस करीत सोलापुर,पुणे,येथे जाणार्‍या महामार्गावरील टोलचे सी.सी.टी.व्ही.तपासत पुणे जिल्ह्यातील चौफुला पोलिस चौकी संपर्क करण्यात आला होता .

यावेळी चौफुला येथिल महामार्ग पोलिसांना दिलेल्या माहीतीवरुन तेथील पोलिसांना सोलापुर मार्गे कोल्हापुरला जाणारा टेम्पो पुणेकडे जात असल्याचे दिसुन आल्याने तात्काळ येरमाळा पोलिसांना माहीती देण्यात आली व येरमाळा पोलिस लागलीच चौफुला येथे जाऊन टेम्पो (क्र,पी.बी. ११.बी वाय.९२१३) चालक मालक रनधीरसिंग वय(४९) भकंरपुर जि.पटियाला ,पंजाब यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आज दि.१३ रोजी चालकास कळंब न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com