esakal | विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, आरक्षण स्थगितीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Rahade

एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली. दरम्यान, आरक्षणाला स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, आरक्षण स्थगितीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली. दरम्यान, आरक्षणाला स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. केतुरा येथील शेतकरी कुटुंबातील विवेक कल्याण रहाडे (वय १८) हा बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती.

मराठा नवउद्योजकांना बँकांसह महामंडळाचा खोडा !  

या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती; मात्र आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शुल्क भरून शिक्षण घेणे अवघड आल्याच्या तणावातून त्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस नाईक राम भंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विवेकचे मामा नवनाथ गणपती वांढरे (रा. केतुरा) यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास भंडाणे करीत आहेत.

  ड्रायपोर्टचे काम प्रगती पथावर, निधी कमी पडू देणार नाही : मंत्री दानवे 

घरात सापडली चिठ्ठी
विवेक रहाडे याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी घरात आढळून आली. त्यात त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी संस्थेत शिक्षण घेण्याची ऐपत नाही. केंद्र व राज्य सरकारने आता तरी समाजातील मुलांची कीव करावी, असा उल्लेख केलेला आहे. कुटुंबीयांनी ही चिठ्ठी पोलिसांकडे दिली असून, आरक्षण स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

Edited - Ganesh Pitekar