मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

मराठा समाजाला कुणबी आरक्षण नसल्यामुळे त्यांनी नीटची परीक्षा देऊन सुध्दा त्याचा रिझल्ट कमी येऊ शकतो.
student from Maratha community who appeared for NEET exam ended his life not getting maratha Kunbi reservation
student from Maratha community who appeared for NEET exam ended his life not getting maratha Kunbi reservation Sakal

नांदेड: मराठा समाजातील नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण मिळाले नसल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील मौजे धानोरा(शे.) येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहा तालुक्यातील मौजे धानोरा(शे.) येथील झाडाला गळफास घेऊन मृत झालेला विद्यार्थी प्रमोद जानकीराम भुजबळ (वय १९) यांनी चिठ्ठीत असे लिहून ठेवले की, मराठा समाजाला कुणबी आरक्षण नसल्यामुळे त्यांनी नीटची परीक्षा देऊन सुध्दा त्याचा रिझल्ट कमी येऊ शकतो.

त्यामुळे तो पात्र ठरवू शकत नाही म्हणून तो त्याचे जीवन संपवित आहे म्हणून यावर सर्व समाजाला त्याची शेवटची विनंती आहे मनोज दादा जरांगे यांना साथ द्यावी अशी विनंती केली आहे. आत्महत्या केलेल्या प्रमोद जानकीराम यांच्या पश्चात आई, आजोबा ,दोन चुलते,भाऊ असा परिवार आहे.

प्रमोद जानकीराम भुजबळ यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच नांदेड दक्षीणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी तीव्र दुःख व्यक्त करून धानोरा (शे.) येथे जाऊन मृत प्रमोद जानकीराम भुजबळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचें सांत्वन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, मयत प्रमोद जानकीराम भुजबळ यांची आई विजेत्याला जानकीराम भुजबळ, आजोबा लक्ष्मण भिवाजी भुजबळ, चुलता मोतीराम लक्ष्मण भुजबळ, चुलता सुरेश लक्ष्मण भुजबळ, भाऊ प्रदीप जानकीराम भुजबळ, सरपंच खुशाल भुजबळ, पोलिस पाटील बालाजी भुजबळ आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com