Sillod Crime
Sakal
मराठवाडा
Sillod Crime : पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला, चार आरोपींना अटक
Student Rescue : केळगाव परिसरात बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण होण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला असून, अमोल मक याची सुटका करण्यात आली.
सिल्लोड : बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला पळवून नेत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्याची सुटका झाली. ही घटना तालुक्यातील केळगाव परिसरात शनिवार (ता.06) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.