Sillod News : मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे; गावकऱ्यांचा प्रशासनावर आक्रोश
Khedi Liha ZP School : खेडी लिहा (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद शाळेची मोडकळीस आलेली इमारत विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली असून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिल्लोड : तालुक्यातील खेडी लिहा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोक्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.