‘या’ कारणामुळे विद्यार्थी करतात आत्महत्या : काय काळजी घ्यावी ते वाचलेच पाहिजे

File photo
File photo

नांदेड : कधी परीक्षा फीसच्या कारणावरून, कधी सायकल, मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून तर कधी गरिबीला कंटाळून, तर कधी अत्याचाराला कंटाळून अशा विविध कारणांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहेत. परिणामी आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यूला कवटाळू लागल्याच्या धक्कादायक घटनांचे प्रमाण जिल्ह्यात अलिकडे वाढत असल्याने मुलांच्या भावविश्‍वात नेमकी काय खदखद चालली आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.  

नकार पचवायला शिकवा
नेमके चुकतेय कोण? पालक की मुले, हा प्रश्‍न गुंतागुंतीचा ठरत आहे. ‘फारच हट्ट करत होते, मुलांना अमुक एक गोष्ट अखेर घेऊन दिली बुवा’, असे सांगण्यात धन्यता मानणारे पालक, की ‘मला माझे पप्पा कधीच नाही म्हणत नाहीत’ असा गोडवा गाणारी मुले...प्रश्‍न फार मोठा आहे, पण यातून सावरण्यासाठी मुलांना कधी तरी प्रेमाने समजावून त्यांना ‘नकार’ पचवायलाही शिकविले पाहिजे.

हट्टातूनच बेदकारपणा वाढीस 
उमलत्या वयातील मुलांत वयोमानानुसार होणारे बदल, पुरेशा ज्ञानाअभावी त्यातून निर्माण होणारे भिन्नलिंगी आकर्षण आणि त्यातील धोके, पालकांनी पुरविलेले हट्ट आणि त्यातून निर्माण होणारा बेदकारपणा, पालकांनाही नकळत मुलांचे सुरु असलेले उद्योग असे अनेक प्रश्‍न आज इंटरनेटच्या नव्या जगात निर्माण झाले आहेत. पालकांना यातील अनेक प्रश्‍नांची जाणीवही नसते. पण, जेव्हा अचानक प्रश्‍न समोर येतो, तेव्हा मात्र ते गांगरून जातात.

पालकच आहेत कारणीभूत
मुले अशी का वागली? मी तर त्याचे सर्व लाड पुरवत होतो, मुलीला शिक्षणासाठी स्वातंत्र्य दिले होते, तरीही त्यांनी असे पाऊल का उचलले, अशा अनेक प्रश्‍नांच्या गुंत्यात तो ओढला जातो आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आत्मत्येने समाजमन आज ढवळून निघाले आहे.  मुलांना अवास्तव दिलेले स्वातंत्र्य, कुटुंबातील हरवलेला संवाद आणि नकाराचा धडा देण्यात गाफील राहिलेले पालक, हेच अशा गोष्टींना कारणीभूत आहे.

पाल्यांशी संवाद वाढविण्याची गरज
यातून सावरण्यासाठी पालकांनी सर्वप्रथम पाल्यांशी संवाद वाढविण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या अडचणींबाबत प्रेमाने, आपुलकीने चर्चा करावी. ‘तो’ किंवा ‘ती’ वयात येत असल्यास मुलाशी वडिलांनी आणि मुलीशी आईने मोकळेपणाने संवाद साधावा. मध्यमवर्गीय कुटुंबात आजही निषिद्ध मानल्या गेलेल्या लैंगिक विषयावर मुलांशी मोकळेपणाने बोलावे. मुलाला मोबाईल दिला असेल तर तो किती वेळ त्याच्यात गुंतत आहे, हेही पाहावे. 

पाल्याला विश्‍वासात घेऊन त्याला प्रेमाने समजावून सांगत नकार पचवायला शिकवा. यातून एक परिपक्व व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल. कोणताही नकार किंवा पराभव हा अंतिम नाही, हे त्यांना हळूहळू समजू लागेल अन् ते धीराने कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतील.
- डॉ. शशिकांत पाटील (मानसोपचारतज्ज्ञ) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com