हिंगोलीतील विज्ञान प्रदर्शन पाहण्यास विद्यार्थ्यांची झुंबड 

राजेश दारव्हेकर
Wednesday, 10 February 2021

कार्यक्रम पाहण्याचा सल्ला देत त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनकडे अधिक चांगल्या पद्धतीने कसे नेता येईल यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.

हिंगोली : येथील एबीएम इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. सोमवारी (ता. आठ) झालेल्या या प्रदर्शनासाठी स्वारातीम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. गणेश शिंदे, सेवानिवृत्ती प्राचार्य जे. एम मंत्री, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, सहाय्यक धर्मदाय आयुक्त रविंद्र धायतडक, शिक्षणाधिकारी (प्रा.) संदिप सोनटक्के,  प्रा. त्रिंबक केंद्र, बॅक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक आशिष बडवणे, डॉ. संतोष कल्याणकर, एबीएम समुहाचे अध्यक्ष दिलीप बांगर, प्राचार्य जोसेफ के जे, प्राचार्य अनुरितेश, अनिता आनंदन, अजिंक्य बांगर, विजय वासू, सचिन डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. गणेश शिंदे म्हणाले, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागामध्ये एबीएम इंग्लिश हायस्कुल विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ठ सुविधा देत आहे. जे. एम. मंत्री यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कला जोपासण्याचा सल्ला दिला व श्याम मानव नरेंद्र दाभोळकर यांचे कार्यक्रम पाहण्याचा सल्ला देत त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनकडे अधिक चांगल्या पद्धतीने कसे नेता येईल यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - पाच हजाराची लाच घेणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास अटक; धर्माबाद येथील घटना

या प्रदर्शनात एबीएम इंग्लिश, स्कूल, हायस्कुल, अन्नपुर्णा सेकंडरी ॲन्ड हायर सेकंडरी हायस्कुल, कलगांव, अन्नपुर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्कॉलर्स, हिंगोली, केब्रीज स्कुल ऑफ स्कॉलर्स, कळमनुरी, लेट माणिक पोदार लर्न स्कुल, वाढोणा, पवार पब्लिक स्कुल हिंगोली, पोदार इंटरनॅशनल स्कुल हिंगोली, रायझन इंग्लिश स्कुल शिरड शहापुर, संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल माळहिवरा, सेक्रेट हार्ट इंग्लिश हायस्कुल हिंगोली, युनिव्हर्सल इंग्लिश स्कुल वसमत आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

विद्यार्थ्यांनी समाजउपयोगी मॉडेल व पोस्टर तयार करुन प्रदर्शनामध्ये मांडले होते. तीन सत्रात स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर विजत्यांना पारितोषिक वितरण झाले. यात मॉडेल मेकींग स्पर्धेमध्ये प्रथम श्रावणी मोरे व महेश जऊळकर, रायझन इंग्लिश स्कुल, शिरड शहापुर यांनी प्रथम,  द्वितीय,  शुभम सरनाईक व ओमकार  जाधव, अन्नपुर्णा सेंकडरी ॲन्ड हायर सेकन्डरी स्कुल, कलगांव, तृतीय इश्वर  धबडगे व ओमकार  रांखोडे अन्नपुर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्कॉलर्स, हिंगोली पोस्टर मेंकीग स्पर्धेमध्ये प्रथम रिधीमा देशमुख व श्वेता  बुजारे, लेट माणिक पोदार लर्न स्कुल, वाढोणा द्वितीय शोर्य साखरे, रायझन इंग्लिश स्कुल, शिरड शहापुर तृतीय किशन शिंगारे, ए. बी. एम. इंग्लिश हायस्कुल यांनी मिळवला. 

येथे क्लिक करापरभणी : सेंद्रिय पद्धतीने पेरुच्या यशस्वी लागवडीतून भरघोस उत्पन्न; मेघा सावंतची धडपड

क्वीज स्पर्धेत प्रथम इश्वर धबडगे व ओमकार राखोंडे, अन्नपुर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्कॉलर्स द्वितीय सुशांत जावळे व राधीका गावंडे, युनिवर्सल इंग्लिश स्कुल वसमत, तृतीय क्रमांक हर्ष अग्रवाल व ओम सोमाणी, ए. बी. एम. इंग्लिश हायस्कुल, हिंगोली यांनी मिळवला. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रमाणत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कला शिक्षक दिनेश भालेराव यांनी शाळेत उत्कृष्ठ छायाचित्र काढल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन सय्यद अनिस व अश्लेषा जोगदंड यांनी केले तर अंजिक्य बांगर यांनी आभार मानले.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students throng to see science exhibition in Hingoli