esakal | सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; डाॅ. संजय हरबडे यांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

The sub-district hospital of Selu has come to be known as a convenient hospital for the treatment of patients. 2.jpg

सेलू उपजिल्हा रूग्णालयात नऊ ऑगस्ट २०१६ रोजी डाॅ.संजय हरबडे यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार आला. पदभार घेतल्यानंतर डाॅ.हरबडे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रथम भर दिला.

सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; डाॅ. संजय हरबडे यांची कामगिरी

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (परभणी) : शासकीय रुग्णालय म्हटले की, असुविधाचे आगार मात्र तो ठपका सेलू उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय हरबडे यांच्या अथक प्रयत्नामुळे पुसण्यात आल्याने अवघ्या साडेतीन वर्षातच सेलूचे उपजिल्हा रुग्णालय रूग्णांच्या उपचारासाठी सोयीचे रूग्णालय म्हणून पंचक्रोशीत ओळखले जावू लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सेलू उपजिल्हा रूग्णालयात नऊ ऑगस्ट २०१६ रोजी डाॅ.संजय हरबडे यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार आला. पदभार घेतल्यानंतर डाॅ.हरबडे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रथम भर दिला. तसेच भौतिक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासह रुग्णांसाठी रूग्णालयातील कर्मचार्‍यांनीही तत्पर राहून त्यांची वेळेत सेवा करावी, यासाठीही डाॅ.हरबडे यांनी कर्मचार्‍यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. रूग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात २०० ते २५० रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येते. तर महिन्याभरात जवळपास २० सिझेरीयन शस्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येतात. तसेच कुटुंब नियोजन शस्रक्रियासह इतरही शस्रक्रिया रुग्णांवर करण्यात येत आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून साहित्य मिळावे. यासाठी पाठपुरावा करून डिजिटल एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आली.

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

रुग्णांच्या नातेवाईकांना विरंगूळा व्हावा म्हणून उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारा जवळच भागात गार्डन (बगीचा) ची उभारणी करण्यात आली. तसेच उपजिल्हा रुग्णालय परिसरात मियावाकी जंगल म्हणजेच घनवन येथील मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने तयार करण्यात आले. या रुग्णालयात सद्य:स्थितीत ५० खाट (बेड) आहेत. सुविधा मिळत असल्याने सेलू तालुक्यासह पाथरी, मानवत, परतूर, मंठा तर बिड जिल्ह्यातील माजलगाव येथून रुग्ण येत असल्याने येणार्‍या रूग्णांना खाटा कमी तसेच कर्मचारी अपुरे पडत आहेत. ही गैरसोय दुर व्हावी यासाठी वाढीव ५० खाटांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र सदरिल प्रस्तावावर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. सद्य:स्थितीत ५५ कर्मचारी या ठिकाणी सेवा बजावत असून जर वाढीव खाटांना मंजुरी मिळाली तर कर्मचारी वाढतील व रूग्णांना सुविधा उपलब्ध होतील.

अपघात कक्षाची उभारणी

अपघातग्रस्त रुग्णांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक सुसज्ज सात खोल्यांच्या अपघात कक्षाची उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. 

loading image