esakal | कळमुरीच्या उपविभागीय अधिकाऱयांनी टोचले कान, कोणाचे ते वाचा...?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रीयीकृत बँकांकडून होत असलेली चालढकल व बँक प्रशासनाची उदासीन भूमिका पाहता उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहता अग्रणी बँकेला पत्र पाठवून चार राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

कळमुरीच्या उपविभागीय अधिकाऱयांनी टोचले कान, कोणाचे ते वाचा...?

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली)- रीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बँकांकडून होत असलेली चालढकल व बँक प्रशासनाची उदासीन भूमिका पाहता उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहता अग्रणी बँकेला पत्र पाठवून चार राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात उपविभागीय कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दत्तक अथवा नेमून दिलेल्या बँकेकडून पीक कर्ज वाटप करताना बँक प्रशासनाकडून विविध कारणे सांगत टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत पिक कर्ज वाटपासंदर्भात बँक कडे गाव दत्तक असतानाही चुकीचे निकष सांगून पिक कर्ज घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना परस्पर बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापका बाबतही प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पिक कर्ज वाटपामध्ये घेतलेली उदासीन भूमिका खेदजनक

याशिवाय मागील काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी कुठलेही कारण नसताना या खरीप हंगामात पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालवली आहे यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनंतर बँक प्रशासनाला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात सूचना केल्यानंतरही संबंधित बँक व्यवस्थापका कडून करण्यात येत असलेले दुर्लक्ष पाहता उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक व पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या पिक कर्ज वाटपामध्ये घेतलेली उदासीन भूमिका खेदजनक असल्याचे कळविले आहे.

हेही वाचा -  नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण

कर्ज वाटप करण्या संदर्भात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना

यासंदर्भात अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकां ना उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पत्र पाठवून बँक प्रशासनाने आपल्या स्तरावर बँक शाखा व्यवस्थापकांना एक समान सूचना निर्गमित करून शेतकऱ्यांना विनासायास कर्ज उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्या संदर्भात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत असल्याचे स्पष्ट झाले

एकंदरीत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याकरिता बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड यानिमित्ताने समोर आली असून पीककर्ज मिळण्याकरिता शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे शिवाय काही बँकांमधून शेतकऱ्यांच्या पिक कर्ज संदर्भात देण्यात आलेल्या संचिका गुणानुक्रमे निकाली काढण्याऐवजी मध्यस्थ व दलालामार्फत उशिरा दाखल झालेल्या संचिका  निकाली काढल्या जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गा मधून करण्यात आला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे