esakal | सक्सेस स्टोरी : भाजीपाल्याबरोबर शेतकऱ्याने फुलविली फळबाग, हिंगोलीत घरपोच मागणीप्रमाणे केली जाते विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली तालुक्यातील पारडा गावात मोठा तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात मोठा धबधबा पडतो ते पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील पर्यटक गर्दी करतात.

सक्सेस स्टोरी : भाजीपाल्याबरोबर शेतकऱ्याने फुलविली फळबाग, हिंगोलीत घरपोच मागणीप्रमाणे केली जाते विक्री

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  हिंगोली तालुक्यातील पारडा येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याबरोबर फळबागांची लागवड करुन दररोज हिंगोली शहरात मागणीप्रमाणे त्याची विक्री केली जात असल्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. यात त्यांचे सर्व कुटुंब सहभागी आहे. 

हिंगोली तालुक्यातील पारडा गावात मोठा तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात मोठा धबधबा पडतो ते पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील पर्यटक गर्दी करतात. या तलावामुळे पारडा गावासह इतरही गावातील शेतकऱ्यांना तलावातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. अनेक शेतकरी फळबाग, भाजीपाल्याची लागवड करतात. गावापासून हिंगोली शहर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असल्याने भाजीपाला उत्पादक शहरात त्याची विक्री करतात. 

येथील शेतकरी बाबुराव मस्के यांना बारा एकर शेती आहे. यात विहीर, बोअरवेल आहे. त्यांनी पारंपरिक पिकाबरोबर पावणे तीन एकर शेतीत विषमुक्त पध्दतीने जैविक निविष्ठा वापरुन पंचस्तरीय फळबाग उभी केलीय या छोट्या क्षेत्रात त्यांनी तायवान पेरु  बाराशे झाडे जे फक्त पंधरा महिण्याचे आहेत. तसेच संत्रा दिडशे झाडे, तायवान पपई अडीचशे झाडे, तीन बहार येणारा एक कलमी आंबा, दहा गावठी आंबे, पंधरा चिकूची झाडे, दहा केळी, यासह आवळा, जांभूळ,  डाळींब, फणस यासह भाजीपाल्यात मिरची,  वांगी दोडका, गावरान कोथंबीर  कोबी, मेथी,गाजर, कारले,  लसून कांदा याची लागवड केली आहे. ते दररोज शहरात भाजीपाल्यासह, फळांची देखील विक्री करतात. यातून त्यांना रोजगार निर्मिती झाली आहे. यासाठी त्यांनी आई, वडील व पत्नीची मोठी मदत मिळते हे दररोज भाजीपाला तोड करुन त्याची देखभाल करतात तर बाबुराव त्याची विक्री करतात. हे कुटुंबीय कठोर मेहनत करते त्यामुळे त्यांना भाजीपाला व फळबागांचा घरसंसारात मोठा फायदा होत आहे. 

भाजीपाल्याच्या विक्रीतून दररोज दिड हजार रुपये तर फळाच्या विक्रीतून तीन हजार रुपये मिळतात स्वतः चे वाहन असल्याने केवळ डिझेल खर्च येतो चालक म्हणून ते स्वतः वाहन चालवितात. त्यांची शेती पाहण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अनेक वेळेस भेटी दिल्या आहेत. हिंगोली शहरातील भाजीमंडीत व मागणी प्रमाणे घरपोच फळे व भाजीपाला पुरवतात. यामुळे त्यांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे. 

शेतात पारंपरिक पिकाबरोबर भाजीपाला व फळबागेची लागवड केली असून मुबलक पाणी असल्याने त्याचा उपयोग होतो. हिंगोली शहरात त्याची नियमित विक्री केली जाते. यासाठी कुटुंबाची मोठी मदत मिळते. यामुळे घरसंसारात आर्थिक हातभार मिळत आहे.

- बाबुराव मस्के, शेतकरी, पारडा

संपादन- प्रल्हाद कांबळे