esakal | येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चा यशस्वी प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शैक्षणिक माहिती उर्वरित अभ्यासक्रमावरील नोट्स, असाईनमेंट्स, सराव परीक्षा, अभ्यास उपयोगी वेबसाईट्स, पावर पॉइंट प्रेसेंटेशन्स, मूल्य मापनासाठी प्रश्नावली, ऑनलाइन ऑडिओ आणि व्हिडीओ इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आल्या. यासाठी व्हॉटसॲप ग्रुप, झूम, मूडल, इझिक्लास, गूगलक्लास रूम, यूट्यूब इत्यादी दृकश्राव्य साधनांचा प्रभावी उपयोग करण्यात आला. 

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चा यशस्वी प्रयोग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पदविका अभ्यासक्रमाचे सम सत्र संपण्यास तीन आठवड्याचा कालावधी असताना ‘कोरोना’मुळे राज्यात लॉकडाउनची घोषणा झाली. यामुळे अध्यापनाचे कार्य थांबले व विद्यार्थ्यांना आपापल्या घरी पाठविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक महेश शिवणकर यांच्या कुशल नियोजनाने उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने ‘वर्क फ्रॉम होम’ हा उपक्रम प्राचार्यांच्या मार्फत राबविण्याचे निश्चित झाले होते.

नांदेड शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विभागप्रमुख व अधिव्याख्यातांच्या सहायाने ‘वर्क फ्रॉम होम’ यशस्वी करुन दाखविला आहे. नांदेड शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाखेतील विभागप्रमुख, अध्यापक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे असणारी स्मार्ट फोनची अनुपलब्धता, इंटरनेटचा अभाव इत्यादी अडचणी असतानाही ६० ते ७० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य झाले. 

हेही वाचा - Video : लॉकडाउनमध्ये कामगारांच्या हाताला काम दिल्यास पोटाचा प्रश्न सुटेल

ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातुन गुणवत्तेवर भर 
विद्यार्थ्यांना सरावासाठी ऑनलाइन टेस्ट सिरिज, क्विजेस, असाईनमेंट्स देण्यात आले व त्याचे ऑनलाइन मूल्यमापन करण्यात आले. सर्वच विषयांचा उर्वरित अभ्यासक्रम नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ‘वर्क फ्रॉम होम’ या उपक्रमाबद्दल असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून प्रतिक्रिया पाठवून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांसोबतच शासनाच्या मार्गदर्शनाने अध्यापकांनीही विविध ऑनलाइन कोर्सेसला प्रवेश घेवून गुणवत्ता वाढीवर भर देण्याचा यशस्वी प्रयत्नही या लॉकडाऊन काळात करण्यात आला. 

हेही वाचा - नांदेडात पती- पत्नीचा एकमेकावर प्राणघातक हल्ला

यांचा आहे मोलाचा वाटा-

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य तथा स्थापत्य विभागप्रमुख पी.डी.पोपळे, उपयोजित यंत्र शास्त्र विभागप्रमुख डी. एम. लोकमनवार, यंत्र विभागप्रमुख आर. एम. सकळकळे, विद्युत विभागप्रमुख व्ही.व्ही. सर्वज्ञ, स्थापत्य विभागप्रमुख एस.पी.कुलकर्णी, उत्पादन विभागप्रमुख एस. एम.कंधारे,  यंत्र विभागप्रमुख एस.एस.चौधरी, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख एस. एन. ढोले, वैद्यकीय अणुविद्युत विभागप्रमुख बी. व्ही. यादव, विज्ञान विभाग नियंत्रक एस. आर. मुधोळकर यांनी प्रयत्न केल्याची माहिती शासकीय तंत्रकिनकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली.   

loading image