स्वयंअध्ययन अभ्यास गट उपक्रमाचा असाही पॅटर्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये स्वयंअध्ययन अभ्यासगट (ग्रुप लर्निंग फ्रॉम होम) हा उपक्रम वाबळेवाडी-परभणी पॅटर्न म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी सोमवारी (ता.सहा) काढले आहेत. जिल्हा परिषद शाळांसाठी वाबळेवाडी-परभणी पॅटर्न म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे

परभणी ः शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये स्वयंअध्ययन अभ्यासगट (ग्रुप लर्निंग फ्रॉम होम) हा उपक्रम वाबळेवाडी-परभणी पॅटर्न म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी सोमवारी (ता.सहा) काढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना आता सकाळी दहा ते दुपारी सव्वाचार या वेळेत शाळेत, गावात थांबणे बंधनकारक झाले आहे. 

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ६५० आहे. या शाळेने मागील दोन महिन्यांत स्वयंअध्ययन अभ्यासगट हा उपक्रम राबवून शंभर टक्के विद्यार्थी अध्ययन करतात हे सिद्ध केले आहे. त्याची दखल घेऊन श्री.पृथ्वीराज यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

हेही वाचा - नवीन अध्यासन व संशोधन केंद्र महापुरुषांच्या नावाने होणार, कुठे? ते वाचाच 

शिक्षक दररोज गटाचे कामाचे नियोजन करणार 
या उपक्रमात गावातील विद्यार्थ्यांचे गल्ली, मोहल्ला, वस्ती वा मुलांचे एकत्र खेळण्याचे गट यानुसार अभ्यास गट निश्चित केले जाणार. यादीतील पाचे ते दहा विद्यार्थ्यांचा गट राहणार आहे. पालकांच्या व्हॉट्सअॅपचे मोबाईल क्रमांक घेऊन वर्गनिहाय गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटाचा विद्यार्थ्यांमधून एक विषय मित्र व पालकांतून एकावर पालक मित्र म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. विषय मित्राच्या मदतीने शिक्षक दररोज गटाचे कामाचे नियोजन करणार आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक : नांदेडला कोरोनाचा १४ तासात दुसरा बळी 

किमान तीन दिवस शाळा भेट 
एससीईआरटीच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना दररोज घटक देणे व स्वयंअध्ययन करून घेणे, अध्ययन निष्पत्ती निश्चित करून त्यावर सराव प्रश्न, स्वाध्याय, गृहपाठ आदी घेण्याची, तपासण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी तिन्ही शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रभारी विस्तार अधिकारी व प्रभारी केंद्रप्रमुख यांना आठवड्यातील किमान तीन दिवस पूर्णवेळ शाळा व तेथील अभ्यासगटांना भेट देण्याचे तर नियमित विस्तार अधिकारी, नियमित केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, विशेष शिक्षक यांना दररोज दोन शाळा याप्रमाणे आठवड्यातील किमान तीन दिवस शाळा भेट व अभ्यासगटांना प्रयत्न भेट देण्याचे आदेश दिले आहेत. श्री.पृथ्वीराज यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such is the pattern of self-study group activities, parbhani news