
छत्रपती संभाजीनगर : ऐन तारुण्यात दोन्ही पाय विकलांग झाले. अचानक आलेल्या या अपंगत्वामुळे आयुष्यात अंधार पसरला. मात्र, तिने हार मानली नाही. मेहनतीची तयारी असल्याने तिने दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला. छोट-मोठ्या स्पर्धांपासून सुरवात करत सातत्य राखल्याने सात वर्षांतच तिला पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.