

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या प्रासादिक वाणासाठी लागणाऱ्या विविध साखर पदार्थ निर्मितीचे येथील कारखाने बंद झाले. कामगारांची संख्या अत्यल्प असल्याने कारखानदारांना हा निर्णय घ्यावा लागला. परिणामी देवीच्या प्रसादासाठी लागणारे विविध वाणाचे पदार्थ सोलापूर, पंढरपूर येथून मागवावे लागत आहेत.