Sugar Recovery Rate: कमी पावसाचा उसाला फटका! साखर उतारा ७.७६ टक्क्यांवर घसरला; ऊसदरासह कारखानदारांसमोर तिहेरी संकट

Sugar Recovery Drops to 7 Point 76 Percent in Sambhajinagar: कमी पाऊस, कमी साखर अन् वाढता खर्च; छत्रपती संभाजीनगरच्या साखर उद्योगासमोर तिहेरी संकट
Maharashtra Sugar Mills Face Challenges as Low Rainfall Reduces Sugarcane Yield and Sugar Recovery Rate This Season

Maharashtra Sugar Mills Face Challenges as Low Rainfall Reduces Sugarcane Yield and Sugar Recovery Rate This Season

sakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड: कमी पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ न झाल्याने आणि ऊस पूर्ण परिपक्व नसल्याने यंदा साखर उताऱ्यात घट झाल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ६ लाख २३ हजार ३८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख १६ हजार २६५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदाचा सरासरी साखर उतारा ७.७६ टक्के नोंदविण्यात आला आहे. गतवर्षी याच कालावधीत हा उतारा ८.३० टक्के होता. त्यामुळे यंदा साखर उताऱ्यात लक्षणीय घट झाली आहे.

Loading content, please wait...