
धाराशिव : मागील वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात एक लाख हेक्टरने वाढ झाली आहे. याशिवाय मागील मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने त्याचाही ऊस पिकाला चांगला फायदा झाला आहे. परिणामी यंदा राज्यातील साखर उत्पादनही ३० ते ३५ लाख टनांनी वाढण्याची चिन्हे आहेत.