Sugarcane Plantation
Sugarcane PlantationSakal

Sugarcane Plantation : पाण्याची सोय असलेल्या परिसरात ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टी होते. यात सखल भागातील पिके नेस्तनाबूत होत आहे.
Summary

गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टी होते. यात सखल भागातील पिके नेस्तनाबूत होत आहे.

कायगाव - गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच सततच्या वातावरणातील बदलांमुळे पिकांवरील रोगराई अटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. यावर पर्याय म्हणून कायगाव, अमळनेर (ता.गंगापूर) परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टी होते. यात सखल भागातील पिके नेस्तनाबूत होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रत्येक वर्षी गोदावरी नदी काठावरील सखल जमिनीचा भाग असलेल्या जामगाव, कायगाव, अमळनेर, लखमापूर, भिवधानोरा, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी आदी परिसरासह शिवना नदी काठच्या पिंपळवाडी, ढोरेगाव, सोलेगाव पुरी आदी गावांना बसतो. परिणामी, सोयाबीन, कपाशी आदी पिके अतिवृष्टीच्या पाण्याने सडून जातात. अनेकदा पिकावर झालेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येतो.

यामुळे गोदावरी आणि शिवना नदी काठच्या परिसरातील शेतशिवारात पाण्याची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी सध्या उसाची लागवड सुरू केली आहे.

ऊस लागवडीचे हे कारण

अधिकचा पाऊस झाल्यास खरीप पिके सडून जातात. पण, ऊस तग धरून राहतो. यातून दोन पैसे हाती येतात. हेच कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या बाबतीत उलटे चित्र आहे.

कारखाना सुरू होण्याची आशा

गतवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावल्याने ऊस उत्पादकांचे मोठे हाल झाले. मजुरांनी पैसे घेऊन ऊस तोडला. दरवर्षी ऊसतोडणीसाठी शेतकरी कारखान्यांकडे पायपीट करीत असतो. पण, गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादकांची ऊसतोडणीसाठी होणारी परवड थांबेल, असे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com