
धाराशिव : जिल्ह्यात एकूण १६ साखर कारखाने आहेत. त्यापैकी दहा कारखाने सध्या सुरू आहेत. याशिवाय सात गूळनिर्मिती कारखानेदेखील सुरू आहेत. या सर्वांची मिळून सुमारे चार हजार वाहने, बैलगाड्या उसाच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर धावत आहेत. मात्र, यातील अनेक वाहने वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. विशेषतः धुळे-सोलापूर महामार्गावर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.