
कुंभार पिंपळगाव : गावासह परिसरातून रात्रंदिवस विविध ऊस कारखान्यांची ऊस भरलेली वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. या वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त ऊस त्याचप्रमाणे वाहनांवर लावलेल्या डीजे साउंडवर मोठ्या आवाजात उडत्या चालीची गाणी रात्रंदिवस वाजवली जात असल्याने अपघाताची भीती आहे.