

Hingoli News
esakal
वारंगा फाटा: पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीतूनही भरघोस नफा मिळवता येतो, हे सुकळी वीर (ता. हदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी नकुल शेषेराव वीर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केवळ एका एकरात कारल्याची लागवड करून त्यांनी सर्व खर्च वजा जाता २ लाख ८ हजार ९०० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.