
नांदेड : मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड आणि त्यामुळे झालेली जमिनीची धूप अशा अनेक कारणामुळे मागील तीन वर्षापासून मराठवाड्याचे तापमान अतिउच्चांक गाठत आहे. त्यामुळे उष्माघाताने काही जण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा सुद्धा कडक उन्हाळा होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. सर्वांनाच या उष्माघातास सामना करावा लागणार आहे. त्यासाठी स्वःताची काळजी स्वःताच घ्यावी लागणार आहे.
जगातल्या इतर वस्तूप्रमाणेच वातावरणातील हवा देखील उष्ण आणि थंड अशा दोन प्रमाणात असते. वसंत ऋतुच्या अखेरीस ग्रीष्म ऋतुपर्यंत उन्हाळ्याची चाहुल लागते. असे असले तरी शरद ऋतुमध्ये सुद्धा उष्णता जाणवायला लागते. या दोन्ही काळातील उष्णतेत फरक असतो. परंतू त्याचे मानवी शरीर होणारी परीणाम भिन्न असतात. म्हणून दोन्ही प्रकारच्या ऋतुमध्ये भिन्न प्रकारचे आजार आणि लक्षणे दिसून येतात. या दरम्यान सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण आढळतात.
पाना फुलांची जागा काट्यांनी व्यापली
पूर्वी घनदाट जंगले होती. त्यामुळे झाडांपासून भरपूर सावली मिळत असे, परंतू या जंगलाच्या देशात आता झाड, पान, फुलांची जागा काट्याने घेतली असल्याने साहजिकच जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. म्हणून कोरडी हवा जाणवते. पाऊस कमी पडतो. परिणामी गरम वारे वाहतात. त्यामुळे मानवाप्रमाणेच मुक्या जनावरांना देखील उष्माघातासारख्या आजारास सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा- मातेने आवळला चिमुकल्याचा गळा, अन्...
योग्य प्रमाणात पाणी प्यावे
उन्हाळ्यात शरीराचे तापमानात संतुलन राखण्यासाठी मानवास जन्मापासून सवय असते. परंतु अनेकाना ऋतुबदलाचा त्रास होतोच. विश्रांती घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान २७ ते ४१ अंशा पर्यंत बदलत गेले तरी, ते सोसण्याची क्षमता शरीरात असते. परंतु तापमान ४२ अंशापेक्षा जास्त झाल्यास मात्र व्यक्तीच्या मस्तिष्कावरील ‘हायर्पोथॅलमस’चे नियंत्रण सुटते. शरिरात उष्णता वाढल्यास रक्ताचे तापमान वाढते. त्याच्या परिणामामुळे मेंदुला ज्ञान होते आणि त्यामुळे शरिराची त्वचा, उच्छवास लघवीद्वारे आणि त्वचेद्वारे उष्णता उत्सर्जनाचे कार्य सुरु होते. यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उष्माघाताचा काही प्रमाणात प्रतिकार करता येणे शक्य होते.
हेही वाचलेच पाहिजे- पिकविमा मंजुरीतील तफावतीमुळे शेतकऱ्यांत नाराजी
अशी ओळखा उष्माघाताची लक्षणे
शरीर आणि ह्रदयास विकृती येणे. उष्माघाताने घायाळ झालेला व्यक्ती मूर्छित होतो. यकृताच्या कार्यात बिघाड होते. मस्तिष्क कार्यात बिघाड, रक्त गोठते, त्यामुळे दिशांचे भान राहत नाही. चक्कर येते. तहान लागून घशाला कोरड पडते, पोटात आग पडते, कालांतराने उष्माघाताचा रुग्ण चक्कर येऊन पडतो.
असा करा उष्माघातापासून बचाव
अंगात सैल कपडे घालणे, कपड्यातून शरिराला हवेसाठी पातळ कपड्यांचा वापर करावा, सावलीत किंवा थंड ठिकाणी रहावे, विविध फुलांच्या वासाने सुगंधीत झालेली मोकळी हवा घ्यावी, वाळ्यांनी भिजलेल्या पंख्याची हवा घ्यावी, बर्फाच्या कपड्याने ओली झालेली चादर पांघरुन घ्यावी. घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली घ्यावी, संपूर्ण चेहरा डोके, रुमालाने झाकून घ्यावे, ऊसाचा रस, लिंबूपाणी, आंब्याच्या कैरीच पन्हे प्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.