कोरोना लसीकरणावरुन सुनील केंद्रेकर भडकले, बैठकीतून COला काढले बाहेर

कोविडचे शंभर टक्के लसीकरण का झाले नाही, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यंत्रणांना चांगलेच फैलावर घेतले.
IAS Sunil Kendrekar
IAS Sunil Kendrekaresakal

हिंगोली : जिल्ह्यात अद्यापही कोविडचे शंभर टक्के लसीकरण का झाले नाही, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांनी गुरुवारी (ता.१६) यंत्रणांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी लसीकरणाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास बैठकीतून बाहेर काढून दिले. हिंगोली येथील जिल्हा (Hingoli) नियोजन समितीच्या सभागृहात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (District Collector Jitendra Papalkar), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. राज्यात ओमिक्रॉनची (Omicron) विषाणूची लाट येण्याची शक्यता असतांना कोविडचे शंभर टक्के लसीकरण का झाले नाही. (Sunil Kendrekar Get Anger Over Corona Vaccination In Hingoli)

IAS Sunil Kendrekar
'राजसाहेब माझं काय चुकलं, मी काम करतोय'

सर्व यंत्रणा काम करीत नाहीत का असा सवाल करून केंद्रेकर यांनी आरोग्य यंत्रणेसह इतर यंत्रणांनाही फैलावर घेतले. कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शंभर टक्के लसीकरणाच्या नियोजनाबाबत शासकिय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता मी आल्यानंतर मला नियोजन सांगून काय उपयोग, सदर नियोजन आधीच करून लसीकरण शंभर टक्के का केले नाही असे ते म्हणाले. गावपातळीवर जाऊन सर्व यंत्रणांनी काम करून लसीकरणाकडे (Corona Vaccination In Hingoli) लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सार्वजनिक ठिकाणी तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक या भागातही लसीकरण केंद्र सुरु करून त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

IAS Sunil Kendrekar
Aurangabad|भरस्त्यात पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबादेत खळबळ

तसेच कोविडची संभाव्य यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सुचना देखील दिल्या. दरम्यान, या बैठकीत लसीकरणाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आयुक्त केंद्रेकर यांनी चांगलेच फटकारले . बैठकीत चुकीची माहिती देता का असा सवाल करून त्यांना बैठकीतून बाहेर काढले. गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी देखील गावपातळीवर जाऊन लसीकरणाबाबत काम करण्याच्या सुचना केंद्रेकर यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com