

Asian Youth Wrestling Gold
sakal
बीड : बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत पाटसरा (ता. आष्टी) येथील सनी सुभाष फुलमाळी याने ६० किलो वजनगटात सुवर्णपदकाला गवसणी घालून देशाची मान उंचावली आहे. प्रतिकूलतेशी रोजच कुस्ती सुरू असताना पालात राहणाऱ्या, माळरानावर सराव करणाऱ्या सनीने मिळवलेले यश आष्टीकरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे.