esakal | शेतकऱ्यांना मदत मिळवून देणाऱ्यांना पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

HARSHWARDHAN JADHAV

शेतकऱ्यांना मदत मिळवून देणाऱ्यांना पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कन्नड तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदत निधी मिळतो. तालुक्यातील जो पक्ष शेतकऱ्यांना सरसकट मदत निधी मिळवून देईल, त्या पक्षाला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाठिंबा देणार तसेच ही मदत न मिळाल्यास कुणालाही तालुक्यात मते मागू देणार नसल्याची माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी(ता.२)कन्नड येथे दिली.

कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून मदत निधी देण्याच्या मागणीसाठी कन्नड तहसीलवर मोर्चा काढला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संजय वारकड यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की, कन्नड सोयगाव मतदार संघात गेल्या १५ दिवसात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले असून भौगोलिक क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शासकीय परिपत्रक १३ मे २०१५ च्या तरतुदीनुसार उपाय योजना करण्यात याव्यात.

सोयाबीन आयातीचा निर्णय मागे घ्यावा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी मयूर जाधव, राजू मोकासे, सुशील गंगवाल, सुनील बोडखे, गणेश पाटील, योगेश कदम, शरद निकम, रवींद्र हारदे, संतोष गायकवाड, उद्धव बोरसे, हर्षद बोरसे, रमेश घनकर, रमेश देशमुख, युवराज बोरसे, अनिल बोडखे, संदीप काळे, अविनाश डगळे, प्रवीण गाढे, राहुल काळे सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top