चक्क... हागणदारीमुक्त फलकाला हार घालुन गांधीगीरी

अमोल जोगदंड
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मालेगाव (ता. अर्धापूर जि. नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असलेल्या मालेगाव येथील कागदोपत्री हागणदारीमुक्त गाव केले. तसे जिल्हा परिषदेने गावाच्या सिमेवर हागणदारीमुक्तीचे फलक लावले. मात्र हा गाव अजूनही हागणदारीमुक्त करण्यास प्रशासनाला यश आले नाही. शेवटी मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रामस्थांनी उभ्या फलकाला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.  

मालेगाव (ता. अर्धापूर जि. नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असलेल्या मालेगाव येथील कागदोपत्री हागणदारीमुक्त गाव केले. तसे जिल्हा परिषदेने गावाच्या सिमेवर हागणदारीमुक्तीचे फलक लावले. मात्र हा गाव अजूनही हागणदारीमुक्त करण्यास प्रशासनाला यश आले नाही. शेवटी मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रामस्थांनी उभ्या फलकाला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.  

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत तालुक्यातील मालेगाव १०० टक्के गाव हागणदारीमुक्त झाल्याचे कागदपत्रकावरच दाखवण्यात आले. प्रशासनाच्या वतीने गावात हागणदारी मुक्त गाव असल्याचा फलक लावण्यात आला. परंतु प्रत्यक्षात गाव मात्र हागणदारी मुक्त झालंच नाही. ग्रामपंचायतीने हागणदरी मुक्त गाव करण्यासाठी योग्य ते प्रयत्न, प्रसंगी कारवाई करणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायतीने याकडे वारंवार कानाडोळा केला. त्यामुळेच मालेगाव १०० टक्के हागणदारी मुक्तीपासून वंचितच राहिले.

हेही वाचाआयएएस अभिमन्यु काळे, अशोक शिनगारेंवर गुन्हा

अर्धापूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ

जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणाहून गावांत येणारे मुख्य रस्ते नांदेड- मालेगाव, वसमत- मालेगाव, 
अर्धापूर- मालेगाव, गिरगाव- मालेगाव या चहू बाजूकडून मालेगावकडे येणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी ग्रामस्थांनी सूचना अर्ज, निवेदने दिले. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात कुठलीही कारवाई न करता थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे संजय पाटील इंगोले, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गजानन इंगोले, गिरजाबाई ऐंगडे, शिवशंकर सोनटक्के आदींसह अन्य नागरिकांनी हागणदारी मुक्त गावच्या फलकाला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

येथे क्लिक करानवरा-बायकोच्या भांडणात गावाचा जीव धोक्‍यात

प्रतिक्रिया :-

कै. मुंजाजी पाटील महाविद्यालय
मालेगाव- गिरगाव रस्त्यावर मालेगाव पासून अर्धा किलोमिटर अंतरावर कै. मुंजाजी पाटील महाविद्यालय आहे. त्या रस्त्यावरून ये- जा करताना प्रचंड दुर्गंधीचा त्रास शिक्षक, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना व त्या भागातील नागरिकांना होतो. याविषयी लेखी निवेदने, अर्ज ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. परंतु सरपंच व ग्रामसेवक यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलन केले.
संजय पाटील इंगोले 
सचिव -मुंजाजी पाटील विद्यालय, मालेगाव

हागणदारी मुक्त गाव हे फक्त कागदावरच आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकाचा व ग्रामपंचायत प्रशासनाचा आम्ही हार घालून निषेध केला.
गजानन इंगोले
युवा सेना तालुका प्रमुख, अर्धापूर

गावात कुठेही स्वच्छता नाही. मी ज्या भागात राहते. त्या इंदीरानगर भागातील रस्त्याने चालता येत नाही. अशी परिस्थिती आहे. या भागातील ग्रामस्थांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही हागणदारी मुक्त गाव असलेल्या फलकाला हार घातला.
गिरिजाबाई ऐंगडे 
सामाजिक कार्यकर्त्या, मालेगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sure ... Gandhigiri defeated the hegandarimukat board