
Dhananjay Munde: राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात कृषी खात्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नुकतंच त्यांना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळाली. मात्र या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अपिल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण कोर्टात योग्य रितीने मांडलं नाही, असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याही स्वतंत्रपणे याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.