मी जामीन घेणार नाही, सरकारच्या चूप बैठ नीतीला विरोधच - सुरेश धस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी झेलायला तयार आहे. मला अटक झाली तरी मी यावर जामीन करणार नाही. सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार, असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. 

आष्टी (जि.बीड) -   ऊसतोड मजुरांवर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. असे एक काय, हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी झेलायला तयार आहे. मला अटक झाली तरी मी यावर जामीन करणार नाही. सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार, असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा विमा उतरविला जातो, मग ऊसतोड कामगारांचादेखील ५० लाख रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. जिल्ह्यात येत असलेल्या ऊसतोड कामगारांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्याची हद्द पार केल्याच्या कारणावरून आमदार धस यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यावर श्री. धस यांनी भूमिका मांडली. 

हेही वाचा - हे तीन ॲप ठरले महत्त्वाचा दुवा - बीडमध्ये बाहेरून आलेल्या ७० हजार जणांची नोंद

ऊसतोड मजुरांबाबत सरकार साखर कारखाने सुरू ठेवत आहेत; मात्र त्या मजुरांमध्ये सोशल डिस्टन्स आहे का? केवळ ५० रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजुरांची बोळवण करू हा कोणता नियम आहे? मजुरांनाही ५० लाख रुपये विमा संरक्षण द्यावे. ऊसतोड मजुरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती. अशा वेळी हा नियम लागू होत नाही का? तीन तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले, मग तिथले प्रशासन काय करत होते? त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे, असेही सुरेश धस म्हणाले. 

हेही वाचा - राजीनामा देऊन परतणारा डॉक्टर अपघातात जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Dhas is opposed to the government's policy