sweetlime
sakal
पाचोड - गतवर्षी सोन्याचा भाव मिळविलेल्या मोसंबीचे दर आता अचानक दक्षिण भारतातील वातावरणात झालेल्या बदलांमुळे कमालीचे घसरल्याने मोसंबी उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला. प्रति टनामागे ४० ते ५० हजार रुपयांची घसरण झाल्याने मोसंबी उत्पादकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरून त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.