Video -‘फिटनेस’ साठी पोहण्याचा व्यायाम ‘परफेक्ट’

नवनाथ येवले
बुधवार, 11 डिसेंबर 2019

विष्णूपुरी प्रकल्पामध्ये पोहण्याची कसरत करत आहेत. भल्या पहाटेपासून प्रकल्पातील काळेश्वर मंदीर परिसरात पोहणाऱ्यांची गर्दी वाढत असून नियमीत पोहणाऱ्या नागरीकांना रोज नवे साथीदार मिळत आहेत.

नांदेड : थंडीचा जोर वाढत असल्याने पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही त्याच जोमात वाढत आहे. प्रत्येक जन आपल्या कौशल्यानुसार व्यायाम करताना भल्या पहाटेपासून मोकळ्या रस्त्यांवर दिसून येतात. पण तणामुक्तीसाठी सराइत पोहणारे नागरीक विष्णूपुरी प्रकल्पामध्ये पोहण्याची कसरत करत आहेत. भल्या पहाटेपासून प्रकल्पातील काळेश्वर मंदीर परिसरात पोहणाऱ्यांची गर्दी वाढत असून नियमीत पोहणाऱ्या नागरीकांना रोज नवे साथीदार मिळत आहेत.

थंडीची चाहूल लागताच मार्निंगवॉकसाठी भल्या पहाटेपासून नागरीकांचे जथ्थेच्या जथ्थे घराबाहेर पडतात. मोकळ्या रस्त्यावर शाररिक हालचालिंच्या कवायती करणारे बालकापासून वृद्धांपर्यंत महिला- पुरुष दिसून येतात. पण पोहता येणाऱ्या नागरीकांचे पाय आपसुकच मोकळ्या पाण्याकडे वळतात. पोहणे ही अशी कला आहे, ज्‍यामुळे तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरित्‍या काम करतो. पोहल्याने पूर्ण शाररिक अवयवांची हालचाल होते. पोहल्यामुळे तणाव व वेदनेपासून आराम मिळतो, रक्‍ताभिसरण सुधारते. नियमीत पोहण्यामुळे स्नायू, सांधे मजबूत होतात. या मुळे भविष्यात संधिवात होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. नियमीत पोहण्यामुळे प्रसन्नता वाटते, दिवसभर तणावापासून मुक्ती मिळते. तीन महिण्यापासून आम्ही विष्णूपुरी प्रकल्पातील काळेश्वर मंदीराच्या घाटावर नियमित पोहण्याचा आनंद घेत असल्याने वजन कमी झाले, रक्‍ताभिसरण सुधारल्याचे सुनिल खपाटे, संतोष बारसे, विक्रम सारंग, गिरमाजी हंबर्डे, दिपक हंबर्डे यांनी सांगीतले.

 हेही वाचा-- नांदेड पणनकडे कपाशीची आवक सुरू ​

शरीर लवचिक बनतेः

अनेक प्रकारच्या व्यायामाच्या तुलनेत पोहण्याने शरीराची लवचिकता अधिक वाढते. पोहणे हा असा व्यायाम आहे ज्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव लवचिक बनतो. त्यामुळे शारिरीक तंदुरुस्तीसाठी पोहता येणे अवश्यक आहे. थंडीचा जोर वाढत असताना पोहण्याची आवड असलेल्या हौश्या सोबत शरातील गोदावरी नदीपत्रात बॅग, ट्यूब यासह सुरक्षीत साहित्याच्या आधारे प्रशिक्षण घेणाऱ्या नागरीकांमध्ये पोहण्याचा उत्साह वाढत आहे.

उघडून तर पहा‘फिटनेस’साठी नांदेडकरांची पीपल्सवर गर्दी ​

शौकीनांची संख्या वाढली ः

निष्णात पोहणारे नागरीक विष्णुपुरी जलशयाकडे धाव घेत आहेत. दरम्यान विष्णूपुरी प्रकल्पातील काळेश्वर मंदीर परिसरता विविध घाटांवर सकाळ पासून पोहणाऱ्यांच्या गर्दीत वाढ होत आहे. प्रकल्पातील काळेश्वर मंदीर परिसरामध्ये नेहमीच नियमीत पोहणारे नागरीक सकाळ पासून सायंकाळपर्यंत येत असतात. परिसरामध्ये पोहणारांना पाण्याच्या खोली बाबत सुचक इशारा देणारे फलक लावण्यात आल्याने येथे प्रक्षीणार्थी पोहण्याचे धाडस करत नाहीत. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी नदी, तलाव, विहरींमध्ये पोहण्याचा शौकीनांणा मोह आवरत नाही. मात्र, यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे हिवाळ्यातच शौकीणांची संख्या वाढली आहे. शहरातील नदीपात्रामध्ये प्रशिक्षणार्थी पोणाऱ्यांची तर विष्णूपुरी जलाशयामध्ये दिवसभर पोहणाऱ्या शौकीनांची गर्दी वाढत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swimming Exercise for 'Fitness' 'Perfect'