

Financial Relief: Ardhapur Farmers Receive ₹35.37 Crore as Crop Insurance Payout
esakal
अर्धापूर : गेल्या खरिप हंगामात पिकांचा विमा काढलेल्या वीस हजार १२८ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३७ लाख रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे.ही मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. आगमी खरिपाच्या हंगामापुर्वी पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.तसेच कृषी व महसूल प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांतून प्रशासना बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.