संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje

संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?

तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश न दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांनी बुधवारी (ता.११) केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यामार्फत निवेदने देण्यात आलेली आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनसंपर्क अधिकारी, धार्मिक व्यवस्थापक, सर्व संबधित अधिकारी यांना निलंबित करावे. (Take Action On Officers Who Didn't Allow Sambhajiraje Chhatrapati In Talujabhavani Mata Temple)

हेही वाचा: Nanded | पार्सलवरील पाकिस्तान नगर पत्त्याने नांदेडमध्ये खळबळ !

या निवेदनावर विजय भोसले, पुष्कराज शिंदे यांच्या सह्या आहेत. जाणता राजा युवा मंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहायक धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, तहसीलदार प्रशासन यांना निलंबित करावे असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर दीपक पलंगे, सुदर्शन वाघमारे, अक्षय सुरवसे आदींच्या सह्या आहेत. यावेळी हिंदुराष्ट्र सेना, श्री शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनांच्या वतीने ही निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते पुण्यात आल्यावर काय झालं ?

त्यामध्ये तहसीलदार प्रशासन, सहजनसंपर्क अधिकारी, धार्मिक व्यवस्थापक यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर परीक्षित साळुंके, बालाजी पांचाळ आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Take Action On Officers Who Didnt Allow Sambhajiraje Chhatrapati In Talujabhavani Mata Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top