Nanded | पार्सलवरील पाकिस्तान नगर पत्त्याने नांदेडमध्ये खळबळ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Viral News

Nanded | पार्सलवरील पाकिस्तान नगर पत्त्याने नांदेडमध्ये खळबळ !

नांदेड : नांदेडमधील एका तरुणाने आपल्या पुतण्यासाठी ऑनलाईन कपडे मागवले होते. कपडे कोलकाता (Kolkata) येथून येणार होते. कपड्याचे पार्सलही मिळाले. मात्र पार्सलवरील पत्ता सोशल मीडियावर व्हायरला झाला आणि एकच खळबळ उडाली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. शेख खलील (रा.देगलूर नाका परिसर) असे ऑनलाईन कपडे मागवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत सदरील प्रकार गैरसमजूतीतून घडल्याचे समोर आले आहे. (Nanded Viral Address News Police Clarify Truth Behind Viral)

हेही वाचा: बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

खलील हा निरक्षर आहे. त्याने मोबाईलमधून व्हाॅईस रेकाॅर्ड करुन संबंधित कंपनीला त्याचा पत्ता पाठविला होता. कंपनीने खलीलच्या नावाखाली पाकिजानगर लिहिण्याऐवजी पाकिस्तान नगर, नांदेड (Nanded), असा पत्ता लिहिला. शहरासह जिल्ह्यात पाकिस्तान नगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरात पाकिजानगर आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये तलवारींचा साठा जप्त, सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण

सदरील प्रकार गैरसमजूतीतून झाल्याचे इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धबडगे यांनी सांगितले आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकू नये. जर कोणी तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे धबडगे म्हणाले.

Web Title: Nanded Viral Address News Police Clarify Truth Behind Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top