esakal | ‘निर्भया वॉक’मध्ये सहभागी व्हा- एसपी विजयकुमार मगर
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

या निर्भया वॉकमध्ये महिला, तरुणी व समाज घटकांनी मोठ्या संख्येने पांढऱ्या गणवेषात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

‘निर्भया वॉक’मध्ये सहभागी व्हा- एसपी विजयकुमार मगर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महिला सक्षमीकरण, सुरक्षा व अन्य मुद्यांवर जनजागृती करण्याच्या हेतूने जिल्हा पोलीस दलाने रविवारी (ता. ८) मार्च रोजी जागतिक महिला दिनी ‘निर्भया वॉक’चे आयोजन केले आहे. या निर्भया वॉकमध्ये महिला, तरुणी व समाज घटकांनी मोठ्या संख्येने पांढऱ्या गणवेषात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने जिल्हा महिला दक्षता समिती, विविध महिला संघटनांच्या सहभागातून ता. आठ मार्च रोजी सकाळी सात वाजता आयटीआय चौक महात्मा ज्योतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून या निर्भया वॉकला प्रारंभ होणार आहे.

जय्यत तयारीची केली पाहणी

शहरातील प्रमुख मार्गावरुन हा वॉक महात्मा गांधी पुतळयाजवळ सकाळी नऊ वाजता सांगता करण्यात येणार आहे. त्यासाठी वजिराबाद पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी जय्यत तयारी केली आहे. या तयारीची पाहणी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी शनिवारी (ता. सात) दुपारी केली आहे. 

वॉक रॅलीत दोन पथनाट्य

या वॉक रॅलीत दोन पथनाट्य, महिला संघटनांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन असा कार्यक्रम सकाळी ११ पर्यंत चालणार आहे. शहरातील कार्यक्रमात पाचही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यात महिलांवर होणारे अत्याचार व मुलींचे होत असलेले अपहरण, छेडछाड व प्रेम प्रकरणांतून महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर होत असलेले प्राणघातक हल्ले लक्षात घेवून, अशा घटनांना आळा घालणेकामी पोलीसांबरोबर निर्भया वॉकमध्ये जनतेचा जास्तीत जास्त सहभागाच्या दृष्टीकोनातून जिल्हा महिला दक्षता समिती व महिला संघटनांनी आवाहन केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ‘निर्भया वॉक’ चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ‘सुरक्षा पेन’चे वाटप करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Video And Photos : विद्यार्थ्यांनी सुरु केले अन्नछत्र, कोणासाठी? ते वाचाच

सुरक्षा पेनचे वैशिष्ट्य 
- घराबाहेर पडताना घरातील व्यक्तींना सांगून जावे. कोणत्याही अनोळखी पुरुषास निर्जन ठिकाणी भेटणे टाळावे तसेच रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी जाणे टाळावे.
- त्याचप्रमाणे आपला कोणी पाठलाग किंवा पाळत ठेवत आहे. ओळख नसताना ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे आढळल्यास आपले प्राचार्य, घरच्यांना किंवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.
- तोंडाला स्कार्फ बांधून फिरणे निदान रात्रीच्यावेळी टाळावे.
- आपला पत्ता, खासगी माहिती, फोन क्रमांक अनोळखी मुलांना किंवा इतर व्यक्तीस देणे टाळावे.
- मुलींनी आपल्या मैत्रिणी, मित्र यांचे नाव, फोन क्रमांक, पत्ता याविषयी पालकांना सविस्तर माहिती देऊन ठेवावी.
- एखाद्या मुलाकडून तुम्हाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्रास होत असल्यास लगेच आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा पोलिसांना कळवावे. त्यामुळे त्यावर कारवाई किंवा प्रतिबंध करणे शक्य होईल.
- व्हाट्सअप, फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर करत असताना अनोळखी व्यक्तीचे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नये, ओळख वाढवू नये तसेच त्यांना आपले पर्सनल फोटो शेअर करू नये.
- स्वतःचे पर्सनल फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असताना सिक्युरिटी सेटिंगमध्ये जाऊन आपले फोटो सिक्युअर करून घ्यावेत.

येथे क्लिक कराकोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या ! लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड जिल्हा पोलिस दलाचे हेल्पलाइन क्रमांक


- पोलीस मदत क्रमांक 100 
- महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी 10 91 /181
- लहान मुलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी 10 98 
- जनतेच्या तक्रारीसाठी व्हाट्सॲप क्रमांक 88 88 88 9255
- महिला सहाय्य कक्ष 024 62 -240 431 
- पोलीस नियंत्रण कक्ष झिर 024 62 -234 720 
- महिला व बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी करिता 15 560 यावर संपर्क साधावा.