दहा हजाराची लाख घेताना  परिक्षण भूमापकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कार्यवाही; पी. आर प्रमाणपत्रा (कार्ड) साठी लाचेची मागणी

परभणी : तक्रारदाराकडून प्लॉटची पी. आर रजिस्टरला नोंद घेवून पी. आर प्रमाणपत्र (कार्ड) देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षण भुमापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.२६) अटक केली.

परभणी येथील तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ता. २८ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून गुरुवारी (ता.२६) सापळा लावण्यात आला. उपाधीक्षक भूमी अभिलेखच्या गंगाखेड येथील कार्यालयातील परिक्षण भुमापक गजानन  किशनराव वानखेडे यांनी तक्रारदाराच्या प्लॉटची पी. आर रजिस्टरला नोंद घेवून पी. आर प्रमाणपत्र (कार्ड) देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेची रक्कम  गुरुवारी (ता.२६) त्यांनी स्विकारली. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

हेही वाचा....

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा 

सोनपेठ (जि.परभणी) : ‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीचा भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुरुवारी (ता.२६) सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये यासाठी पोलिस प्रशासन वारंवार विनंती करत आहे. प्रसंगी विनाकारण फिरणाऱ्यांना फटकेदेखील देण्यात येत आहेत. परंतु आता पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा -‘लॉकडाऊन’ने चिमुकला दुरावला आई -वडीलांपासून
तिघांच्याही मोटारसायकल जप्त

ता.२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, राहुल परसोडे, महेश कवठाळे, पांडुरंग काळे, नरेंद्र कंबळे यांचे पथक रस्त्यावर गस्त घालत असतांना त्यांना रस्त्यावर विनाकारण फिरणारे तसेच मास्क न लावता मोटारसायकलवर फिरणारे दत्ता लक्ष्मण कऱ्हाळे (रा.सोनपेठ), आकाश प्रल्हाद धुमाळ (रा. कौडगाव), रमेश ज्ञानोबा भुरे (रा. कौडगाव) यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम ५१ ब व भादवी १८८ तसेंच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबधित तिघांच्याही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक तपास सोनपेठ पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taking ten thousand lacs Arrested for test geometry