टाकळी राजेराय - आधी घरकुल दिली, आणि नंतर मालमत्तेचे दस्ताऐवजच गायब करून बेघर करण्याचा प्रकार खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय ग्रामपंचायतीच्या अंतर्गत उघडकीस आला आहे..सर्वसामान्याशी निगडीत असलेल्या जन्म प्रमाणपञ, मृत्यु प्रमाणपञ, मालमत्तेचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याची जवाबदारी असणार्या ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे महत्वाचे दस्ताऐवजच गायब झाल्यामुळे सर्वसामान्यांना ञास सहन करावा लागत आहे..काही दिवसापुर्वी ग्रामपंचायत सदस्य पती रईस शेख यांनी आपल्या मालमत्तेचे नमुना नंबर आठ मागितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दस्ताऐवजनुसार १०६९ पर्यंत नोंदी दिसुन आल्या तर त्यानंतर ह्याच नोंदी ११३६ क्रमांकार्यंत नोंदीचे दस्ताऐवज गायब असुन त्यानंतरच्या नोंदी पुन्हा असल्याचे ग्रामसेवक यांनी लेखी स्वरुपात दिले आहेत.या गायब झालेल्या नोंदीचे दस्ताऐवज गेले कुठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बाबत गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन देउन चौकशी करण्याची मागणी केली आहे..अनेकाकडे आहे जुन्या नोंदीचे पुरावेगायब झालेल्या नमुना नंबर आठ व जन्म मृत्यु प्रमाणपञाची अनेकाकडे जुनी नोंदीचे पुरावे आहेत. तर आदिवासी व इतर समाजातील अनेक जनांनी नमुना नंबर आठवर याच ग्रामपंचायतीमार्फत घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. व घरही बांधलेले आहे. त्यावेळेस उपलब्ध असलेले दस्ताऐवज आता कुठे गेले असा प्रश्न उपस्थित झाला आहे..रइस शेख (निवेदन कर्ता) -काही दिवसापुर्वीच मी माझ्या मालमत्तेचे नमुना नं. आठ मागितले असता ग्रामसेवकाने ते दस्ताऐवजच नसल्याचे लेखी दिले आहे. हे दस्ताऐवज गेले कुठे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.