‘या’ तालुक्यात १२३१ जण ‘होम क्वारंटाइन’

dhrmabad.JPG
dhrmabad.JPG


धर्माबाद, (जि.नांदेड) ः तेलंगणा राज्यात मजुरी करणारे ५४ मजूर रविवारी (ता. २९) बासर येथील चेकपॉइंटवर परतले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. तसेच लॉकडाऊन काळात धर्माबाद शहरासह ग्रामीण भागात आंतरजिल्ह्यातून आलेले १२३१ जणांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. याची शंभर टक्के प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येत असून संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीही करण्याचे काम केले जात आहे.

१४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला 
तेलंगणातील संगारेड्डी येथून मजुरी करणारे २४ पुरुष मजूर, १८ महिला मजूर, १२ मुली, असे एकूण ५४ मजूर बासर येथील चेक पॉइंटवर आले. त्यातील धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील ३५, कंधार तालुक्यातील काठकळंबा येथील सात, मुखेड येथील चार व बिलोली तालुक्यातील सावळी, कासराळी येथील आठ, असे एकूण ५४ मजूर आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. या सर्वांना लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात होम क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद शहरात आंतरजिल्ह्यातून १८० नागरिक, तर ग्रामीण भागात आंतरजिल्ह्यातून ९९७ नागरिक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तसेच शहरात १४ विदेशी लोक होम क्वारंटाइनमध्ये ठेवले आहेत. या सर्व लोकांना १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला असून पोलिस या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत.

२४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. मात्र, जीवनावश्यक साहित्याच्या नावाखाली अनेकांचे शहरभर फिरणे सुरूच आहे. प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने फिरणाऱ्या ८६ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याकडून २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील रसिकनगर येथील सायल्लू सायन्ना निलपवार यांनी अवैधरीत्या देशी दारू विक्री करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १८० एमएलच्या ११६ देशी दारूच्या बॉटल ( किंमत सहा हजार ३२ रुपये) जप्त केल्या. तर करखेली येथील सुरेश प्रभू खांडरे यांच्याकडून १८० एमएलच्या १५ बॉटल ( किंमत ९०० रुपये) जप्त केल्या आहेत. धानोरा तांडा येथील भीमराव हरी चव्हाण व गोविंद हरी चव्हाण हे दोघे बोळसा रेल्वेस्टेशन परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री करताना आढळले. त्या दोघांकडून हातभट्टी दारू एक लिटरचे ५० बॉटल (किंमत पाच हजार रुपये) जप्त करून कारवाई करण्यात आली. 

कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था
करखेलीचे शेख शादिक शेख जावेद, खाजा पाशा शेख जावेद, शेख जावेद शेख जलील, रत्नाळीचे शेख मुवीन शेख शादुल्ला, फुलेनगरचे विजय पुंडलिक उतकर आदींनी लॉकडाऊन दरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्वामी समर्थ सेवा भावी संस्थेच्या वतीने संचारबंदी दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सुबोध काकाणी परिवाराच्या वतीने दररोज १०० किलो तांदळाची खिचडी गरजू लोकांना वाटप करण्यात येत आहे. येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डी. एन. शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड, मुख्याधिकारी मंगेश देवरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे, गटविकास अधिकारी श्रीकांत बेळदे, डॉ. वेणूगोपाल पंडित, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. शेख नसीमा इकबाल यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिस कर्मचारी युद्धपातळीवर कोरोनाशी लढाई देत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा - ​ सावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय
या वेळी ‘लॉकडाऊन’च्या काळात आम्ही कर्तव्यावर आहोत, फक्त तुम्ही घराबाहेर पडू नका. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा. कारवाई करण्यास भाग पाडू नका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येईल. असे सोहन माछरे, पोलिस निरीक्षक, धर्माबाद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com