esakal | शुल्लक कारणावरुन तूर केली जाते परत
sakal

बोलून बातमी शोधा

toor.jpg

शेतकरी अगोदरच अनेक संकटांचा सामना करीत आहे. वारंवार येणाऱ्या नैसर्गित आपत्तीमुळे शेती साथ देत नाही. त्यातच थोडेफार पिकले तर त्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

शुल्लक कारणावरुन तूर केली जाते परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासनाने शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व त्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी किमान हमी दरानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. परंतु नायगाव येथे असलेल्या तूर हमी खरेदी केंद्रावर मात्र, शेतकऱ्यांची शुल्लक कारणावरुन पिळवणूक होत आहे.

शुल्लक कारणावरुन माल केला जातो परत
शेतकरी अगोदरच अनेक संकटांचा सामना करीत आहे. वारंवार येणाऱ्या नैसर्गित आपत्तीमुळे शेती साथ देत नाही. त्यातच थोडेफार पिकले तर त्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शासनाने किमान हमी दरानुसार शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मात्र, या शासकीय खरेदी केद्रांवरही शेतकऱ्यांची शुल्लक कारणावरुन पिळवणूक होत असून शेतकऱ्यांच्या माल योग्य नसल्याचे सांगुन तो परत करण्यात येत आहे. ह

हेही वाचा.....लॉकडाऊनमध्ये सर्व नियमांचे पालन आवश्यक

संदेश आल्यानंतर तूर आनली खरेदी केंद्रावर
परत केलेल्या मालाची नोंदही खरेदी केंद्रावर होत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर तो शेतमाल मातीमोल भावाने विकण्याची वेळ आणत आहेत. याची परिचिती गुरुवारी नायगाव येथील तूर खरेदी केंद्रावर दिसून आली. कहाळा बुद्रुक येथील शेतकरी नारायण पाटील कहाळेकर यांनी तुरीला शासनाच्या खरेदी केंद्रावर योग्य भाव मिळून न्याय मिळेल या आशेने आॅनलाइन केले. त्यांना गुरुवारी (ता. १६) तूर घेऊन येण्यासाठी मोबाइलवर मेसेजद्वारे कळविण्यातही आले. त्याप्रमाणे त्यांनी गावातून एक हजार रुपये भाडे देवून खासगी वाहनाने तूर घेऊन खरेदी केंद्रावर नेली. 

हेही वाचलेच पाहिजे..... अंबाजोगाईत एक हजार कोरोना वॉरियर्सची फौज

खासगी व्यापाऱ्याला द्यावी लागली तूर
त्या ठिकाणी तुरीचे माप करून घेण्यात आली व पोते सोडून एक ढीग तयार केला. मात्र, नंतर एवढे करूनही तूर भेसळ, आहे म्हणत ती खरेदी करण्यास नकार दिला. तसेच तूर परत नेण्यास सांगितली. त्या शेतकऱ्यांनी विनवनी करूनही केंद्रावरील एकाणेही तूर घेण्याची तसदी घेतली नाही. शेवटी त्या शेतकऱ्याला दुसरी भाड्याची गाडी करून दुसऱ्या खासगी व्यापाऱ्याला नाईलाजाने तूर विकून परत गावाकडे यावे लागले.

शेतकऱ्याचे होत आहे नुकसान
या प्रकारामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जर या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाला नाव ठेवून परत पाठवायचे असेल तर दे खरेदी केंद्र चालूच कशाला ठेवता. शेतकरी अगेदरच खूप जखमी आहे. त्यांच्या या जखमांवर अशा प्रकारे अजून मीठ कशाला चोळता, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.


तूर परत नेण्यास सांगितले
दोन महिन्यांपूर्वी आॅनलाइन केल्यानंतर बुधवारी तूर घेऊन येण्याचा संदेश आला. त्यामुळे एक हजार रुपये भाडे देवून तूर घेऊन गेलो. पण नंतर तुरीत भेसळ आहे म्हणून तूर परत नेण्यास सांगितले. यानंतर पुन्हा गाडी करून तूर खासगी व्यापाऱ्याकडेच नेऊन विकावी लागली. 
- नारायण पाटील कहाळेकर,
शेतकरी, कहाळा (बुद्रुक, ता. नायगाव) 

loading image
go to top