चहाची क्रेझ वाढते अशी

tea photo
tea photo

नांदेड : मोठ्या शहरात प्रसिद्ध झालेल्या गोष्टीचे अनुकरण नंतर इतर शहरातही होत असते. त्यामुळे आता इतर शहरातही मॉल, विविध कंपन्यांच्या दुकाना सोबतच महाराष्ट्राचे आवडते पेय चहा असल्यामुळे चहाच्या दुकानांचीही देखील क्रेझ वाढली आहे. पुण्या मुंबईतील नावाजलेली चहाची दुकाने आता राज्यातील इतर शहरातही दिसत आहेत. नांदेडमध्ये देखील काही महिण्यापासून चहाच्या दुकानांची संख्या वाढत चालली असून त्यातून चहाप्रेमीसोबतच रोजगाराचीही संधी अनेकांना उपलब्ध झाली आहे.
 
नांदेडमध्ये पूर्वी चहाची दुकाने होती. पण त्याला मार्केटिंगची जोड नव्हती. त्यामुळे एखादा कट चहा पिला की पाच ते सहा रुपये देऊन चहाप्रेमी मोकळे व्हायचे. पण गेल्या दोन चार महिन्यात नांदेड शहरात चहाची मोठी दुकाने आली आणि सगळच बदलून गेले. विशेष म्हणजे सहा रुपयांचा चहा दहा रुपयांना झाला तरी देखील या दुकानांमध्ये चहा पिणे प्रतिष्ठेचे झाले आणि त्यासाठी प्रत्येकाला एका कपामागे चार रुपये जास्तीचे द्यावे लागले. तरी देखील चहाप्रेमींची गर्दी वाढते आहे. 

स्वच्छता आणि आकर्षण
नवीन झालेल्या चहाच्या दुकानांमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर टापटिपपणा तसेच चहाची चव या सगळ्यांसोबतच मार्केटिंग असल्यामुळे चहाप्रेमी देखील आकर्षिक होत आ
हेत. पुणे आणि मुंबईतील विविध चहाची दुकाने नांदेडमध्ये वाढली असून त्यातून एक प्रकारे रोजगार निर्मितीही झाली आहे. चार बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्याचा आनंद तर आहेच त्याचबरोबर चहाची चव देखील अनेकांना भुरळ पाडणारी आहे.

अनेक दुकाने दाखल
गेल्या दोन चार महिन्यात नांदेड शहरात येवले चहा, प्रेमाचा चहा, नंबर वन चहा, चाय पे चहा, गुळाचा चहा, पाटील चहा, चौपाल चहा, अमृतुल्य चहा, छोटु चहा, पप्पु की चहा अशी दुकानाला विविध नावे देऊन चहाची दुकाने सुरु झाली आहेत. येवलेंचा चहा केवळ पुणेकरांना माहिती होता. पण येवले बंधुंनी चहा महाराष्ट्रभर नेला. जाहिरातबाजी करुन मागील वर्षभरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात चहाची दुकाने धडाक्यात सुरु केली. 

मराठवाड्यात सुरु झाली दुकाने
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात शेकडो चहा वाल्यांनी चहाची दुकाने थाटली होती. नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, वसमत, मानवत, वाशिम हायवे लगत असलेल्या लहान मोठ्या शहरात शेकडो चहाची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. नांदेड शहरामध्ये आईसक्रीम पार्लरप्रमाणे दर आठ दिवसाला नवीन चहाची दुकान सुरु होत आहे. त्यामुळे चहावाल्यांमध्ये फक्त अन फक्त चहा विकण्याची स्पर्धा लागली नसून माझी चहा चवीने कसा चांगला आहे, यासाठी कुणी गुळाचा चहा, कुणी आद्रक, विलायची, सुंठ मिऱ्यांचा चव असलेला चहा बनवून आपापल्या परीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच चहाचे दर देखील एकसमान नाहीत. पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत चहाचे दर ठेवण्यात आले आहेत. 

चहा झाला प्रतिष्ठेचा
जितके जास्त चहाला पैसे तितकी त्याची क्रेझ अधिक झाली आहे. त्यामुळे चहा महाग असला तरी एकदा प्यायला काय हरकत आहे, असे म्हणून दुकानात जाऊन एकदा तरी चहा पिण्याची अनेकांची सुप्त इच्छा असते. शिवाय जितके पैसे जास्त तितकी प्रतिष्ठा मोठी असा समजही ग्राहकांमध्ये निर्माण होत आहे. एकदा तरी सहपरिवार महागड्या चहाच्या दुकानात जाऊन चहाचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळे एका अर्थाने चहा ही जणू सर्वांची प्रतिष्ठेची बनली असल्याचे दिसून येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com