

Teacher Attacked in Front of Police Over WhatsApp Chat Dispute in Sambhaji Nagar
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘पत्नीला व्हॉट्सॲपवर चॅटिंग व कॉल का करतोस, मुकुंदवाडी येथे राहतोस का’, अशी विचारणा करीत तिघांनी शिक्षकाचा चाकू घेऊन पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी शिक्षकाने थेट वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली; मात्र पाठलाग करणाऱ्यांनी पोलिसांसमोरच त्यांच्यावर हल्ला केला. हातातील कड्याने डोक्यात मारहाण करून जखमी केल्यानंतर साथीदारांनीही शिक्षकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना २३ सप्टेंबर दुपारी वसंतराव नाईक चौकात घडली.