
जालना : जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच एक शिक्षक चक्क झोपेत असल्याचे प्रकरण समोर आले. दरम्यान, या प्रकरणात शिक्षण विभागाने त्या शिक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले असून, पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.