Fake Film Scam : चित्रपटात काम देण्याचे आमिष; शिक्षकाला ४९ लाखांचा गंडा, उदगीर येथील घटना
Udgir News : निडेबन येथील शिक्षकाची फिल्म इंडस्ट्रीत भूमिका, पुरस्कार, सदस्यत्वाचे आमिष दाखवून ४८.९५ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
उदगीर : शहरालगत असलेल्या निडेबन येथील एका शिक्षकास चित्रपटात घेतो, फिल्म इंडस्ट्रीत पुरस्कार मिळवून देतो, असे आमिष देऊन बनावट प्रमाणपत्र देत ४८ लाख ९५ हजार ९६५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.