सदरील मुलगी बाथरूममध्ये गेली असता, त्याने दरवाजा जोरात ढकलून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी मुलीच्या शरीरास वाईट हेतूने दाबून तिचा विनयभंग केला.
मुरुड : मुरुड जवळील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक (Teacher at Zilla Parishad School) असलेल्या नराधमाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून रंगपंचमीच्या (Rangpanchami) दिवशी तिचे जीवन बेरंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल बुधवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत संबंधित शिक्षकावर मुरुड पोलिस स्टेशनमध्ये (Murud Police Station) पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.